पुढारी वृत्तसेवा
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये नामीबियाविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने नवा विक्रम आपल्या नावावर केला.
संजूने सूर्यकुमार यादवचा एक विशेष विक्रम मोडीत काढला आहे.
सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या संजू सॅमसनने अवघ्या ८ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. यात १ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
२०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या संजूला विश्वचषकमधील पहिला सामना खेळण्यासाठी तब्बल ११ वर्षे वाट पाहावी लागली.
टी-२० विश्वचषकात सर्वाधिक वयात पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो आता दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
यापूर्वी सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये वयाच्या ३१ वर्षे आणि ४० व्या दिवशी विश्वचषक सामन्यात पदार्पण करत हा विक्रम केला होता.
सर्वाधिक वयात पहिला विश्वचषक खेळणार्या खेळाडूंच्या यादीत फिरकीपटू अमित मिश्रा (३१ वर्षे, ११७ दिवस) अव्वल स्थानी आहे.
संजू सॅमसनने ३१ वर्षे, ९३ दिवस (२०२६) वयात विश्वचषकात पदार्पणाचा सामना खेळत सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला आहे.