पुढारी वृत्तसेवा
स्वयंसूचना म्हणजे मनातील सकारात्मक विचार, भावना, वर्तन याबाबत सतत स्वतःला सांगणे. यामुळे मेंदू सकारात्मक बदल स्वीकारतो.
फ्रेंच फार्मासिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ एमिल क्यूए (१८५७–१९२६) यांनी स्वयंसूचना ( Autosuggestion) ही पद्धत प्रथम विकसित केली.
१९२० मध्ये एमिल क्यूए यांचे 'Self Mastery Through Conscious Autosuggestion' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांच्या पद्धतीचा मुख्य आधार 'एकाग्रतेचा नियम' (Law of Concentrated Attention) हा होता.
क्यूए यांचा असा विश्वास होता की, नकारात्मक ऐवजी सकारात्मक परिणामांवर लक्ष केंद्रित करावे. (उदा. "मी आजारी पडणार नाही" म्हणण्याऐवजी "मी निरोगी होणार आहे" असे म्हणणे.)
प्लेसबो इफेक्ट (Placebo Effect) : केवळ "मी बरे होणार आहे" या विश्वासाने शरीरात होणारे सकारात्मक बदल आता वैद्यकीय शास्त्रही मान्य करते, ज्याची सुरुवात क्यूए यांच्या फार्मसीमधील प्रयोगातून झाली होती. जाणून घेऊया मन:शांती देणाऱ्या सोप्या टिप्स...
सकाळची सकारात्मक सुरुवात : “आजचा दिवस शांत. मी उद्दिष्टपूर्तीसाठी सज्ज आहे”, अशी स्वयंसूचना सकाळी देणे दिवसाच्या मनःस्थितीवर सकारात्मक परिणाम करते.
आरशात चेहरा पाहून “मी शांत आहे. माझा आत्मविश्वास हळूहळू वाढत आहे” असे म्हणा. संशोधन दर्शवते की, सकारात्मक संवाद आत्मविश्वास वाढवतो आणि तणाव कमी करतो.
“मी आव्हानात्मक परिस्थितीला शांतपणे सामोरे जाईन” अशी स्वयंसूचना देणे मनोबल वाढवते, असे मानसशास्त्रीय अभ्यासांनी सिद्ध केले आहे.
“तणाव येणार पण मी शांत राहीन”, या स्वयंसूचनेने भावनिक स्तर सुधारतो आणि तणावाला सामोरे जाण्याची शक्यती वाढते.