‘खाना खजाना’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांना आज जगभरात ओळखले जाते..भारतीय पाककृतींना जागतिक स्तरावर नेणाऱ्या संजीव कपूर यांच्या यशामागचा प्रवास मात्र अनेकांना माहिती नाही..संजीव कपूर यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मुंबई येथून केली..त्यांनी पहिली नोकरी जुहू येथील सेंटॉर हॉटेलमध्ये केली, जे त्या काळात खूप लोकप्रिय हॉटेल मानलं जात होतं..संजीव कपूर यांना केवळ २८ व्या वर्षी एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून बढती मिळाली..सेंटॉर हॉटेलमधील अनुभवामुळेच त्यांना पुढे ‘खाना खजाना’ सारखा कार्यक्रम होस्ट करण्याची संधी मिळाली..संजिव कपूर यांनी 'खाना खजाना' सुरू करताना काही एपिसोड्स फुकटात शूट केले होते, कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते..त्यांनी त्यांची दोन जुनी ओळखपत्रं सोशल मीडियावर शेअर करत भावनिक आठवणी सांगितल्या..त्या स्वयंपाकघराने मला घडवलं, तेच माझं विश्व बनलं. त्याने मला आव्हानं दिली, शिकवलं, प्रेरित केलं आणि योग्य दिशा दिली, असं त्यांनी सांगितलं. .त्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला प्रवास राष्ट्रीय टेलिव्हिजनवर ‘खाना खजाना’ होस्ट करण्यापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितलं..तेव्हापासून बरेच काही बदलले आहे. पण ही जुनी ओळखपत्रे मी कुठून आलो, मी कोण होतो त्याची एक सुंदर आठवण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. .ज्याठिकाणी त्यांनी नोकरी केली ते सेंटॉर हॉटेल पुढे 'ट्युलिप स्टार' म्हणून ओळखलं गेलं, पण काही काळातच ते बंद पडलं..निक्की तांबोळी पावसाळ्यात थोडीशी फिल्मी होतेय...!