Samantha diet : समंथाने सांगितलं तिच्या फिटनेसच रहस्य; 'हा' आहे तिचा साधा-सोपा डाएट प्लॅन!

पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नेहमीच तिच्या अभिनयाने आणि फिटनेसने चाहत्यांची मनं जिंकते. पण तिच्या या चमकदार आरोग्यामागे एक खास रहस्य आहे. 

तिने नुकताच तिच्या आहारातील काही खास गोष्टींचा खुलासा केला आहे.

समंथा सांगते की, पूर्वी ती फक्त वजनाचा विचार करायची, पण आता तिला कळलं आहे की शरीरातील सूज किंवा दाह नियंत्रित ठेवणं किती महत्त्वाचं आहे.

तुमच्या शरीरासाठी काय योग्य नाही, हे ओळखून ते टाळणं हाच माझ्या डाएटचा मुख्य उद्देश आहे," असं ती म्हणते.

समंथाच्या जेवणाच्या ताटात काही गोष्टी हमखास असतात. ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट्स, आणि फ्लॉवर यांसारख्या पौष्टिक भाज्या ती आवडीने खाते.

तिच्या आहारात देशी तूप, हळद, सॅलरी आणि कोल्ड-प्रेस्ड तेलांचा समावेश असतो, जे आरोग्यदायी फॅट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत.

आरोग्यदायी म्हटलं की सगळ्याच हिरव्या भाज्या खायला हव्यात, असं नाही. समंथाला पालक सारख्या भाज्या आवडत नाहीत, 

तिला तिच्या आहारात सातत्य ठेवायला आवडतं. "मी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण घेते आणि मला रोज तेच जेवण करायला आवडतं," असं ती सांगते. 

मोठे सेलिब्रिटी जेवणासाठी खास शेफ ठेवतात, पण समंथाने हा मामला अगदी साधा ठेवला आहे. तिचा मदतनीस तिच्यासाठी जेवण बनवतो आणि शूटिंगच्या वेळीही तो तिच्यासोबत असतो.

किशोरवयात बारीक असला तरी आतून शरीर निरोगी असणं आवश्यक, असं ती म्हणते.

Parul Gulati | Parul Gulati instagram-gulati06
डेटिंगसाठी ३० वर्षांखालील मुलंच का आवडतात? अभिनेत्री पारुल गुलाटीने सांगितलं कारण