डेटिंगसाठी ३० वर्षांखालील मुलंच का आवडतात? अभिनेत्री पारुल गुलाटीने सांगितलं कारण
पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री आणि उद्योजिका पारुल गुलाटीने रिलेशनशिपवर एक मोठं विधान केलं आहे.
Parul Gulati | Parul Gulati instagram-gulati06
तिच्या मते, तिला जास्त वयाच्या पुरुषांपेक्षा कमी वयाचे पुरुष अधिक आकर्षक वाटतात.
Parul Gulati | Parul Gulati instagram-gulati06
पारुलने म्हटलं की, "३० वर्षांखालील मुलांना शिकवता येतं." तिच्या मते, जास्त वयाचे पुरुष अनेकदा त्यांच्या विचारांवर ठाम असतात, तर कमी वयाचे पुरुष नवीन गोष्टी शिकायला आणि बदलायला तयार असतात.
Parul Gulati | Parul Gulati instagram-gulati06
पारुलला प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफ यांच्यामुळे आशा वाटते. "त्यांनी कमी वयाच्या पुरुषांशी लग्न केलं आहे. यावरून दिसतं की नात्यांमध्ये वय हा अडथळा नाही," असं ती म्हणाली.
Parul Gulati | Parul Gulati instagram-gulati06
कमी वयाच्या मुलांशी बोलणं सोपं वाटतं," असं पारुलचं मत आहे.
Parul Gulati | Parul Gulati instagram-gulati06
तिच्या मते, नात्यात सर्वात महत्त्वाचं 'ऐकून घेणं' असतं. जर जोडीदार तुमचं म्हणणं ऐकून घेत असेल, तर नातं यशस्वी होऊ शकतं.
Parul Gulati | Parul Gulati instagram-gulati06
पारुलने नाती तुटण्यामागचं एक महत्त्वाचं कारण सांगितलं आहे.
Parul Gulati | Parul Gulati instagram-gulati06
"महिलांना वाटतं की पुरुष बदलतील आणि पुरुषांना वाटतं की महिला त्यांना कधीच सोडून जाणार नाहीत, यामुळेच लग्न टिकत नाही," असे ती म्हणते.
Parul Gulati | Parul Gulati instagram-gulati06
पारुलच्या मते, आजकालचे तरुण पुरुष भावनिकदृष्ट्या अधिक जागरूक होत आहेत. त्यांच्यात बदल स्वीकारण्याची आणि नात्यात संवाद साधण्याची तयारी वाढत आहे, जी एक सकारात्मक बाब आहे.