पुढारी वृत्तसेवा
मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला आरोग्य, आयुर्वेद आणि स्किनकेअर तज्ज्ञांकडून दिला जातो.
त्याचे प्रमुख कारण म्हणजे मिठात असणारे नैसर्गिक खनिजे - मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम
मिठाच्या पाण्यामुळे मज्जासंस्था शांत होण्यास मदत होते.
दिवसभराचा मानसिक ताण, चिंता आणि दगदग कमी होऊन मन फ्रेश होते.
कोमट मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास स्नायूंचा ताण कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते.
मीठ नैसर्गिक एक्सफोलिएटरचे काम करते. यामुळे Dead Skin निघून जाते
Pores मोकळी होतात, त्वचेवरील घामाची दुर्गंधी, बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते
ज्या लोकांना अंगावर बारीक पुरळ, खाज, पिंपल्सची समस्या असते, त्यांना आराम मिळतो.
रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात पाय धुण्यामुळे शरीर रिलॅक्स होते
रोज मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे टाळावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा