Rahul Shelke
आज बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आपला 60वा वाढदिवस साजरा करत आहे.
तीन दशकांहून अधिक काळ सलमानने सिनेमावर राज्य केलं आहे.
सलमान खानचा जन्म 27 डिसेंबर 1965 रोजी झाला. मुस्लिम वडील आणि हिंदू आईमुळे त्यांचं बालपण दोन्ही संस्कृतींमध्ये घडलं.
सलमानने प्राथमिक शिक्षण ग्वालियरमधील द सिंधिया स्कूलमधून पूर्ण केलं. याच शाळेत त्यांचे भाऊ अरबाज खानही शिकत होते.
यानंतर सलमानने मुंबईतील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल, बांद्रा येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं.
शाळेनंतर सलमान खानने सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथे प्रवेश घेतला. मात्र अभिनयाच्या ओढीमुळे त्याने कॉलेज शिक्षण अर्धवट सोडलं.
सलमानला समजलं की त्याच स्वप्न सिनेमा आहे. म्हणून त्याने अभ्यासाऐवजी अभिनयाचा मार्ग निवडला.
थेट हिरो बनण्याआधी सलमान खानने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. इतकंच नाही, तर त्याने तीन स्क्रिप्ट्सही लिहिल्या होत्या.
सलमान खानला पेंटिंगची विशेष आवड आहे. हा छंद आई सलमा खान यांच्याकडून जोपासला.
त्याची चित्रं अनेकदा प्रदर्शनातही मांडली जातात.
2007 मध्ये सलमानने Being Human Foundation ही संस्था सुरू केली. या माध्यमातून हजारो गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते.