'तेरे नाम' सुपरहिट चित्रपटासोबतच सलमानच्या लूकची देखील तितकीच चर्चा झाली होती .२००३ मध्ये आलेल्या या चित्रपटात त्याने राधे भैय्याची भूमिका साकारली होती .आता कपिल शर्मा शो मध्ये त्याने हिट 'तेरे नाम' हेअरस्टाईलविषयी सांगितलं .सलमान म्हणाला, 'जो छोट्या गावचा हिरो असायचा, त्याचे लांब केस असायचे'.'जुन्या जमान्यातदेखील सर्व हिरो लांब केस ठेवत असत' .सलमानने 'तेरे नाम'मधील त्याच्या हेअरस्टाईलविषयी सांगितलं .तो म्हणाला, 'खरंतर हा लूक अब्दुल कलाम यांच्याशी प्रेरित होता' .मला वाटतं की, 'राहुल रॉयचीदेखील हिच हेअरस्टाईल होती' .''तर 'तेरे नाम'चा लूक तिथूनच आला आहे'' .'कधी तू..आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात', शिवालीचा बहारदार व्हाईट फोटोशूट