Asit Banage
साई पल्लवी सेंथामराय ही एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे.
ती तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम करते.
साई पल्लवीचा जन्म ९ मे १९९२ रोजी तामिळनाडू राज्यातील कोटागिरी येथे झाला.
२०१५ मधील मल्याळम चित्रपट प्रेमम मधील मलरच्या भूमिकेमुळे ती पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आली.
तिने २०१७ रोमँटिक चित्रपट फिदा मध्ये भानुमतीची भूमिका साकारून तेलगूमध्ये पदार्पण केले.
तिचे शालेय शिक्षण अविला कॉन्व्हेंट स्कूल, कोईम्बतूर येथे झाले.
पल्लवी शिक्षणाने डॉक्टर आहे, तिने २०१६ मध्ये एमबीबीएस (वैद्यकीय पदवी) पूर्ण केली आहे.
तिबिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मधून २०१६ मध्ये तिने आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.