Asit Banage
जगात असा एक मसाला आहे ज्याची किंमत मौल्यवान धातूपेक्षाही जास्त आहे. या मसाल्याला लाल सोने असेही म्हटले जाते.
हा मौल्यवान असणारा मसाला म्हणजे केशर होय.
केशर (Saffron) हा जगातील सर्वात महागड्या मसाल्यांपैकी एक असल्याने त्याला ‘लाल सोने’ म्हटले जाते.
क्रोकस फुलांमधून केशर हाताने काढावे लागते, ही प्रक्रिया वेळखाऊ आणि मेहनतीची आहे.
केशराची किंमत त्याच्या दुर्मिळतेमुळे अनेकदा सोन्याइतकी किंवा त्याहून जास्त असते.
आयुर्वेद, युनानी व आधुनिक औषधोपचारात केशराचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
जगातील सुमारे 90 टक्के केशरचे उत्पादन इराण या देशात घेतले जाते.
केशर उत्पादनात भारत दुस-या क्रमांकावर आहे. जम्मू आणि काश्मीर येथील पंपोर भागात प्रामुख्याने केशरचे उत्पादन घेतले जाते.