पुढारी वृत्तसेवा
टी-२० विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्यपूर्व सामना बुधवार, ४ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे.
कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या या हायव्होल्टेज लढतीसाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे.
विशेष म्हणजे, यंदाच्या विश्वचषकाच्या साखळी फेरीत जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी विजय मिळवला होता.
बाद फेरीचा इतिहास काहीसा वेगळा आहे. टी-२० फॉरमॅटचा विचार केला तर विश्वचषकात आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये ५ सामने झाले असून पाचही वेळा दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण १९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने १२ तर न्यूझीलंडने केवळ ७ वेळा विजय मिळवला आहे.
यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा संघ अजेय असून त्यांनी सलग सात सामने जिंकले आहेत.
न्यूझीलंडच्या संघाला भारतीय खेळण्यचा दांडगा अनुभव आहे. याचा फायदा त्यांना उपांत्य फेरीत होऊ शकतो.
आजवर आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ ३ वेळा नॉकआउटमध्ये भिडले आहेत. या तिन्ही सामन्यांत दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आयसीसी नॉकआउटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्यात दक्षिण आफ्रिकेला अद्याप यश आलेले नाही. हा जुना रेकॉर्ड पुसून काढण्याचे मोठे आव्हान बुधवारी दक्षिण आफ्रिका संघासमोर असेल.