Namdev Gharal
रशियाने १९७६ मध्ये अगदी भयचकीत करणारा एक रडार तयार केला होता. याचे नाव हाेत ‘डुगा रडार’
आजच्या युक्रेनमधील चर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात, प्रीपियाट शहराच्या अगदी जवळ हा रडार उभारण्यात आला होता
याची रेंज ४०,००० किलोमिटर एवढी, (संपूर्ण जग व्यापणारी) अमेरिकेने डागलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे वेळीच ओळखणे हे याचे काम होते
हा रडार सुरु केला की जगभरच्या रेडिओवर एक विचित्र टकटक आवाज ऐकू यायचा, जो दर १० हर्ट्झ वेगाने होत असे.
हा आवाज इतका तीव्र होता की त्याने वैमानिक, नौदल, आणि रेडिओ ऐकणार्यांना हैराण केले होते
युक्रेनच्या कीव (Kyiv) शहरापासून सुमारे हे 100 किमी अंतरावर याचा सांगाडा उभा आहे
या रडारचा आकार महाकाय होता याची उंची सुमारे 150 मीटर तर लांबी 700 मीटर इतकी होती
हा रडार सुरु केला की यासाठी जवळपास 10 मेगावॅट्स इतकी विज लागायची
चर्नोबिल अणूस्फोट दुर्घटनेनंतर हा रडार बंद पडला.१९८९ पर्यंत याचा रशियाकडून वापर होत होता.
हा रडार एक प्रचंड लोखंडी जाळ्यांनी तयार केलेले अँटेना सिस्टम होते, जे आजही चर्नोबिल परिसरात उभे आहे.
हे क्षेत्र आता बंदी असलेले संरक्षित आहे जिथे फक्त विशिष्ट परवानगीने पर्यटक व संशोधक जाऊ शकतात.