Namdev Gharal
सोशल मीडियावर सध्या क्रेझ असलेली ही गोंडस, विचित्र आणि भन्नाट डॉल म्हणजे Labubu!
लाबूबू ही ‘द मॉन्स्टर’ नावाच्या टॉय सिरीजमधील डॉल असून हाँगकाँगमधून ‘पॉप मार्ट’ हा ब्रँड या डाॅल तयार करते
सध्या ट्रेंडिंग असल्याने इंस्टाग्राम, यूट्यूब शॉर्ट्स, रील्समुळे या डॉलला लोकप्रियता मिळाली
‘ब्लाइंड बॉक्स’मध्ये विक्री – कोणती डिझाईन येईल हे कळत नाही त्यामुळे उत्सूकता वाढते.
#Labubu #PopMartLabubu #CuteMonsters अशा हॅशटॅगखाली हजारो व्हिडिओ आणि पोस्ट्स व्हायरल आहेत.
अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये याची क्रेझ दिसत आहेत,
गोंडस आणि वेगळा चेहरा, मोठे डोळे, चपटे नाक असा याचा अवतार असतो
अनेकजण याला शोपीस, लकी चार्म मानतात यामुळे याची लोकप्रियता अधिकच वाढली
या डॉलच्या नकली कॉपीज ३०० पासून ४०० पर्यंत मिळतात, किचेन एडीशन ६०० ते १००० रुपयांपर्यंत आहेत.
तर स्पेशल एडीशनच्या किंमती, ब्लाईंड बॉक्स एडीशन या ३,००० पासून पूढे ४,००० पर्यंत येतात
स्पेशल व्हारियंट्स आणि स्पेशल्ड एडिशन १५,००० ते २०,००० पर्यंतही जातात. ई कॉमर्स साईटवर या विक्रीसाठी उपलब्ध असतात
जंगल, वॉरिअर, पार्टी अशा वेगवेळया थीम मध्ये या डॉल येतात