आपला घसरणारा जन्मदर रोखण्याच्या प्रयत्नात रशिया गर्भवती किशोरवयीन शाळकरी मुलींना सरकारी मातृत्व प्रोत्साहन योजनेतून लाखो रूपये देत आहे. .या अंतर्गत गर्भधारणा पूर्ण करून मुलांचे संगोपन करण्यासाठी मुलींना सुमारे १.१ लाख रुपये रक्कम दिली जात आहे. .रशियाच्या जन्मदरातील संकटावर मात करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. .जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मात्र रशियाला इशारा दिला आहे. .१० ते १९ वयोगटातील मुलींमध्ये गर्भधारणा प्रौढ गर्भधारणेच्या तुलनेत आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे WHO ने म्हटले आहे. .यामध्ये एक्लॅम्पसिया, प्रसूतीनंतरचे संक्रमण आणि प्रसूतीदरम्यान होणाऱ्या गंभीर समस्यांसारख्या जीवघेण्या परिस्थितींचा समावेश आहे. .इतकेच नाही, तर किशोरवयीन मातांच्या मुलांना कमी वजनाचे बाळ, अकाली जन्म आणि नवजात बालकांशी संबंधित गुंतागुंतीचा धोका जास्त असतो..जागतिक स्तरावर, माता मृत्यूंमध्ये किशोरवयीन गर्भधारणेचे प्रमाण चिंताजनक आहे..रशियन पब्लिक ओपिनियन रिसर्च सेंटरच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, ४३% रशियन लोक या नवीन धोरणाचे समर्थन करतात, तर ४०% लोक विरोध करतात..जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील माता आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी किशोरवयीन गर्भधारणा रोखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. .प्रेम, लग्न आणि गोंधळ! विजय सेतुपतीची हिरॉइन नित्या मेनन पुन्हा चर्चेत!