Vijay Sethupathi Nithya Menen : प्रेम, लग्न आणि गोंधळ! विजय सेतुपतीची हिरॉइन नित्या मेनन पुन्हा चर्चेत!

पुढारी वृत्तसेवा

तमिळ चित्रपटसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला ट्रेलर म्हणजे ‘थलैवन थलैवी’.

विजय सेतुपती आणि नित्या मेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हा सिनेमा २५ जुलै रोजी प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे.

या चित्रपटात सुरुवातीला दोघांचं रोमँटिक आणि नव्या लग्नानंतरचं नातं दाखवलं गेलं आहे.

पण काही वेळातच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि त्यांच्या संयुक्त रेस्टॉरंट व्यवसायावरही त्याचा परिणाम होतो.

विजय सेतुपती आणि नित्या मेनन यांची जोडी २०२२ मधील ‘19(1)(a)’ या मलयाळम चित्रपटात एकत्र झळकली होती.

चित्रपटामुळे तिच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली.

चित्रपटातील तिच्या साडी आणि क्लासिक लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.

प्रेम, लग्न आणि त्यानंतर येणाऱ्या अपरिहार्य घरगुती कलहाच्या एका प्रेमळ पण गोंधळलेल्या कथेला उजाळा देणारा हा चित्रपट आहे.

जेनेलियाचा साडी आणि गजऱ्यातला मोहक लूक