पुढारी वृत्तसेवा
वयाच्या चाळीशीनंतर धावण्यास सुरुवात करणे पूर्णपणे शक्य आहे, योग्य पद्धतीने केल्यास ती दीर्घकाळ टिकणारी आरोग्यदायी सवय ठरू शकते
मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा इतिहास, छातीत दुखणे किंवा धाप लागणे, गुडघे, कंबर किंवा घोट्यांचा त्रास, लठ्ठपणा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
धावण्यापूर्वी ईसीजी, रक्तदाब, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाइल किंवा इतर तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्या
पहिल्याच दिवशी 3–5 किमी धावू नका, ५ मिनिटे चालणे, १ मिनिट हलके धावणे, २ मिनिटे चालणे, हे चक्र २०–३० मिनिटे करा. हळूहळू धावण्याचा वेळ वाढवा
धावण्यासाठी चांगल्या दर्जाचे रनिंग शूज महत्त्वाचे आहेत. पायाच्या आकाराला अनुरूप असावेत, पुरेसा कुशनिंग असावा, जुने किंवा झिजलेले बूट वापरू नयेत
धावण्यापूर्वी ५–१० मिनिटे वॉर्म-अप करणे आवश्यक, जलद चालणे, घोटे, गुडघे, कंबर फिरवणे, लेग स्विंग, हलके लंजेस केल्याने दुखापतीचा धोका कमी होतो
वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचे असते, सुरुवातीला आठवड्यातून ३ दिवस धावा, विश्रांती घ्या, अंतर किंवा वेळ आठवड्याला साधारण १० % पेक्षा जास्त वाढवू नका
आठवड्यातून २ दिवस शक्तिवर्धक व्यायाम करा, स्क्वॅट्स, लंजेस, ग्लूट ब्रिज, प्लँक, कॅल्फ रेझेस, यामुळे गुडघे आणि कंबर अधिक सक्षम राहते
धावण्यापूर्वी केळी, ओट्स, टोस्ट, हलका नाश्ता घ्या, धावल्यानंतर प्रथिने (दूध, दही, अंडी, डाळी, पनीर) कार्बोहायड्रेट दिवसभर पुरेसे पाणी प्या. ७–८ तास झोप घ्या
गुडघ्यात सतत वेदना, घोटा सुजणे, टाचेत तीव्र दुखणे, छातीत दुखणे, असामान्य धाप लागणे, चक्कर येणे अशी लक्षणे असल्यास धावणे थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्या