पुढारी वृत्तसेवा
तुमचे वय, आरोग्य, गर्भावस्था, पचनाचा त्रास, पाठदुखी किंवा हृदयाचे आजार यानुसार योग्य झोपण्याची पद्धत बदलू शकते
एखादा विशिष्ट आजार असल्यास झोपण्याची योग्य स्थिती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावी.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या स्थितीत तुम्हाला आरामदायी, सलग आणि गुणवत्तापूर्ण झोप मिळते, तीच तुमच्यासाठी सर्वोत्तम असते
सर्वसाधारणपणे डाव्या कुशीवर झोपणे हे पचन, अॅसिडिटी आणि गर्भावस्थेसाठी अधिक फायदेशीर मानले जाते.
वैद्यकीय संशोधनानुसार डाव्या कुशीवर झोपणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर मानले जाते
डाव्या कुशीवर झोपल्यास अन्नाचे पचन आणि आतड्यांची हालचाल अधिक सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.
डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येण्याची शक्यता कमी होऊ शकते. वारंवार छातीत जळजळ होते, त्यांच्यासाठी ही स्थिती उपयुक्त ठरू शकते
विशेषतः गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यांत डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे गर्भाशय आणि बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते
डाव्या कुशीवर झोपल्याने काही व्यक्तींमध्ये हृदयावरचा ताण कमी होण्यास आणि शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.