संधिवाताचा (Arthritis) त्रास असलेल्यांनी काय टाळावे, 6 महत्त्वाच्या टिप्स

मोनिका क्षीरसागर

संधिवात (Arthritis) ही आजकाल खूप सामान्य समस्या झाली आहे.

यात प्रामुख्याने सांध्यांमध्ये वेदना होणे, सूज येणे आणि सांधे जखडणे अशी लक्षणे दिसतात.

जर तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल, तर औषधोपचारांसोबतच तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात काही बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.

थंड हवामानामुळे सांधे जास्त आखडतात. त्यामुळे सांध्यांना उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा आणि खूप थंड पाण्याने अंघोळ करणे टाळा.

सांधेदुखी असताना अचानक खूप जड व्यायाम किंवा धावणे टाळावे. त्याऐवजी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योगासने किंवा हलका चालण्याचा व्यायाम करावा.

आयुर्वेदानुसार, संधिवात (Arthritis) हा शरीरातील 'वात' दोष वाढल्यामुळे होतो. कोरडा आहार घेतल्याने शरीरात रुक्षता वाढते. त्यामुळे असा आहार टाळा

एकाच स्थितीत दीर्घकाळ बसून राहिल्याने रक्ताभिसरण मंदावते आणि सांधे 'लॉक' झाल्यासारखे वाटू शकतात. म्हणून फारवेळ एकाच स्थितीमध्ये बसणे टाळा

येथे क्लिक करा...