पुढारी वृत्तसेवा
सांधेदुखी ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे
वंगण कमी होणं
सांध्यांमधली स्निग्धता कमी झाली की हाडांमध्ये घर्षण वाढतं
स्नायूचा कडकपणा
काम करताना चुकीची बसण्याची पद्धत, कमी हालचालींमुळे स्नायू आखडले जातात आणि सांध्यांवर ताण येतो
वात वाढणं
तेल-तूप कमी, रूक्ष आहार आणि अनियमित दिनचर्येमुळे वात वाढतो आणि सांधे कोरडे होतात
पचनाच्या समस्या (गॅसेस, आम)
पचन नीट नसेल तर शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. जे सांध्यांमध्ये जाऊन दुखणं वाढवतात
थंडी आणि पावसाळा
थंड आणि दमट हवामानामुळे कोरडेपणा आणि वात वाढतो, म्हणूनच या ऋतूंमध्ये सांधेदुखी हमखास वाढते