कोंबडा पहाटे सूर्योदयापूर्वीच बांग का देतोः काय आहे शास्त्रीय कारण?

Namdev Gharal

हजारो वर्षांपासून जेव्हा घडाळ्याचा शोध लागायचा होता त्‍यावेळी पासून पहाटेची चाहूल ही कोंबडा आरवण्यामुळे लागते.

आजही आदिवासी भागांमध्ये, दुर्गम वाडीवस्तींमध्ये कोंबड्याची बांग म्हणजे सकाळ झाल्याचा संकेत असतो.

पण याच्या पाठीमागे काही शास्त्रीय कारणे आहेत. त्‍यापैकी एक म्हणजे कोंबड्याच्या शरीरात असलेले ‘जैविक घड्याळ’ (Internal Biological Clock)

कोंबड्यांच्या मेंदूमध्ये एक सर्केडियन रिदम (Circadian Rhythm) नावाची नैसर्गिक घड्याळ प्रणाली असते. जी सूर्योदय होण्याच्या अंदाजे 1.5 तास आधी सक्रिय होते.

म्हणून अंधार असतानाही, जरी सूर्य दिसत नसला तरी कोंबडा स्वतःच्या नैसर्गिक घड्याळानुसार पहाटेच्या वेळी बांग देतो.

दुसरे कारण म्हणजे पहाटे सूर्य उगवण्याआधी खूप मंद प्रकाश तयार होतो. हा प्रकाश मानवाला कदाचित जाणवत नाही, पण कोंबड्याच्या डोळ्यांना आणि त्वचेला तो जाणवतो.

या अत्‍यल्प प्रकाशामुळे त्याचा मेंदू सक्रिय होतो आणि तो खुराड्यातून बांग देण्यास सुरवात करतो.

अजून एक कारण आहे ते म्हणजे स्वताचे क्षेत्र जाहीर करण्यासाठी. कोंबडा सुरुवातीची बांग देतो कारण तो स्वतःचे क्षेत्र (Territory) जाहीर करत असतो.

त्‍यामुळे प्रत्‍येक मानवी वस्तीत कोंबडा आरवला म्हणजे दिवसाची सुरुवात झाली. असे मानले जाते. यावरुन अनेक म्हणी वाक्प्रचारही रुढ झाले आहेत.

पायात स्प्रिंग बसवलेली माकडे