Unique Indian Festivals|सोशल मीडियामुळे 'रौलाणे' लोकप्रियतेच्‍या लाटेवर स्वार, काय आहे परंपरा?

पुढारी वृत्तसेवा

हिमाचल प्रदेशातील किन्नौर या आदिवासी जिल्ह्यातील कल्पा भागातील लोकांशिवाय 'रौलाणे' हा उत्सव फारसा कोणाला माहीत नव्हता.

होळीनंतर साजरा केला जाणार्‍या 'रौलाणे' उत्सवाचे गेल्‍या वर्षी फोटो इंटरनेटवरील फोटोंनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले होते. परिणामी, यावर्षी सोहळ्यासाठी पर्यटकांनी गर्दी गेली होती.

'रौलाणे' हा उत्सव 'सौनी' नावाच्या आकाशीय अप्सरांना निरोप देण्यासाठी साजरा केला जातो.

स्‍थानिकांची अशी श्रद्धा आहे की, या अप्सरा कडाक्याच्या थंडीत डोंगरदऱ्यांचे रक्षण करतात. वसंत ऋतूच्या आगमनासोबत स्वर्गात परततात.

या उत्सवातील रंगीबेरंगी आणि दुर्मिळ विधींमुळे सोशल मीडियावर सर्वत्र याचीच चर्चा सुरू झाली.

एकेकाळी स्थानिक पातळीवर शांतपणे साजरा होणारा हा उत्सव आता सोशल मीडियामुळे बहुचर्चित झाला आहे.

किन्नौरी कापडांची उधळण हेही या उत्‍सवात लक्षवेधी ठरते.

परंपरेनुसार, रौला (प्रतिकात्मक वर), रौलाणे (प्रतिकात्मक वधू) आणि पुंडलु (रक्षक) यांची ओळख उघड करायची नसते. त्यांचे चेहरे दाखवणे किंवा संवाद साधणे वर्ज्य आहे.

हा उत्सव मानवी भक्ती आणि दैवी संरक्षण यांच्या मीलनाचे प्रतीक आहे. तो केवळ इंटरनेटवरील मनोरंजनासाठी नाही, असे स्‍थानिकांनी स्‍पष्‍ट केले आहे.

सोशल मीडियामुळे किन्नौरची संस्कृती जगासमोर आली असली, तरी पवित्र परंपरांचे पावित्र्य कसे राखायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

येथे क्‍लिक करा.