पुढारी वृत्तसेवा
भारतीय जेवणात चटणी नेहमीच एक खास पदार्थ राहिली आहे, जी जेवणाची चव वाढवते. डाळ-भात असो किंवा गरमागरम पराठे, त्यासोबत मसालेदार आणि तिखट टोमॅटो चटणी बनवल्याने जेवणाचा आनंद वाढतो.
गावाकडील स्वयंपाकघरातील आठवणी जागृत करणारी अशी चटणी, चुलीवरील आगीवर शिजवलेल्या चटण्या वारंवार खाणाऱ्यांना खवय्यांना आकर्षित करतात.
ही चटणी बनवण्यासाठी, ताजे टोमॅटो घ्या, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या, त्यानंतर हे टोमॅटो थेट आगीवर भाजून काढा. साल काळी होईपर्यंत आणि आतील गर मऊ होईपर्यंत टोमॅटो फिरवत रहा
टोमॅटो पूर्णपणे भाजल्यानंतर, त्यांची साल सहजपणे काढा. आतील मऊ टोमॅटोचा लगदा एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून बारीक करुन घ्या.
मऊ टोमॅटो गरामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण आणि ताजी कोथींबीर टाका. चवीसाठी मीठ, हळद आणि थोडीशी लाल मिरची टाका. फोडणीसाठी एक चमचा मोहरीचे तेल टाका. ज्यामुळे या टोमॅटोच्या चटणीचा गावाकडची चव येते.
टोमॅटोची चटणी आगीवर शिजवलेली इतकी चविष्ट होते, चपाती, पराठा, खिचडी, डाळ-भात किंवा इतर कोणत्याही नाश्त्यासोबत ही चटणी वाढली तरी, प्रत्येक वेळी त्याची चव वेगळी असते. थंडीमध्ये आगीजवळ बसून ही चटणी खाणे हा एक खास अनुभव असतो.
टोमॅटोमधील लायकोपीन आणि व्हिटॅमिन 'सी' शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. लसूण आणि हिरव्या मिरच्यांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ही चटणी स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
जर तुम्ही तुमच्या नेहमीच्या चटण्यांनी कंटाळला असाल, तर ही देशी शैलीची चटणी एक उत्तम पर्याय आहे. एकदा तरी करुन बघा, संपूर्ण कुटुंबाला ही चटणी नक्कीच आवडेल.