Roasted Papad : पापड भाजून खाणे चांगले की तळून ? परिणाम माहित आहेत का ?

अंजली राऊत

भाजलेल्या पापडामुळे शरीरातील सोडियमची पातळी वाढते ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

पापड भाजल्यामुळे ऍसिडिटी, गॅस आणि पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

पापड भाजून खाणे हे पापड तळण्यापेक्षा जास्त आरोग्यदायी आहे. कारण तळल्याने त्यामध्ये तेल आणि कॅलरी वाढतात, तर भाजल्याने हलके राहते

भाजलेले पापड हलके होऊन खाण्यास योग्य असले तरी जास्त प्रमाणात पापड खाल्ल्याने भविष्यात किडनीवर ताण येऊ शकतो.

भाजलेला पापड आतड्यांना चिकटून राहू शकतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या तक्रारी निर्मणा होतात.

बाजारातून विकतच्या पापडाऐवजी घरगुती कमी खार आणि कमी मीठ असलेलेच पापड खा.

Millet Laddu : हिवाळ्यात थंडीपासून वाचायचे असेल, तर खा बाजरीचे लाडू