अंजली राऊत
थंडीपासून वाचवण्यासाठी बाजरीच्या पिठापासून बनवलेले हे लाडू खा, हे लाडू बनवायला सोपे आहेत आणि त्यासाठी खूप कमी मेहनत घ्यावी लागते.
दोनशे ग्रॅम बाजरीचे पीठ, गूळ 250 ग्रॅम, तूप 150 ग्रॅम, काजू 10-12, बदाम 10-12, गोंद (डिंक) 2 टेबलस्पून, दोन ते तीन चमचे खोबरा किस लागेल, वेलची पावडर अर्धा टीस्पून
प्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात बाजरीचे पीठ घाला आणि मंद आचेवर खरपूरस होईपर्यंत परतून घ्या. पीठ भाजले की ते प्लेटमध्ये काढा.
आता त्याच पॅनमध्ये तूप घाला आणि डिंक फुगेपर्यंत तळा आणि नंतर तो बाहेर काढा. एक तवा गरम करा आणि त्यात नारळाचे तुकडे हलके भाजून घ्या. ते सोनेरी रंगाचे होणार नाहीत याची काळजी घ्या.
बाजरीचे पीठ आणि डिंक भाजल्यानंतर, गूळ एका पॅनमध्ये घाला आणि मंद आचेवर वितळू द्या. गूळ वितळला की, गॅस बंद करा आणि बारीक चिरलेले बदाम, काजू, पिस्ता आणि तुमच्या आवडीचे इतर कोणतेही सुकामेवा घाला.
सगळे साहित्य मिक्स करा
गूळात बाजरीचे पीठ, खोबरा किस घाला आणि सगळे साहित्य मिक्स करा. चव आणि सुगंधासाठी वेलची पावडर देखील घाला.
सर्व साहित्य एकत्र चांगले मिसळा आणि हे आता लाडूचे मिश्रण तयार आहे. गरम केलेले तूप सोबत ठेवा आणि थोडेसे तळहातावर लावा आणि नंतर लाडूचे मिश्रण मुठीत धरुन लाडू बांधा. हिवाळ्यात फायदेशीर असे बाजरीचे लाडू आवडीने खा व खायला द्या.