Ostrich Powerful Kick |शहामृगाची लाथ बसली तर सिंहाची बरगडीही तुटते!

Namdev Gharal

Ostrich शहामृग हा जरी पक्षी असला तरी तो कधीही हवेत ऊडू शकत नाही पण निसर्गाने त्‍याला एक विशेष गोष्ट बहाल केली आहे ते अतिशय ताकदवान पाय

या स्ट्राँग पायाने तो जोरात लाथ मारु शकतो. जाणून घेऊया त्‍याच्या या विशेष पायांच्या ताकदीविषयी आणि त्‍याच्या किकविषयी

या लाथेची ताकद साधारण 2,000 PSI (पाउंड पर स्क्वेअर इंच) पर्यंत पोहोचू शकते. हे सिंह, चित्ते, लांडगा, हायना आणि मोठ्या शिकार्‍यांना परतवण्यासाठी पुरेसे असते.

धोका दिसला की तो पुढील बाजूला अतिशय वेगाने किक मारतो. याची ही किक बसली तर सिंहासारख्या मोठ्या शिकारी प्राण्याच्या बरगड्याही मोडू शकतात.

शहामृगाच्या लाथेमुळे अनेक वेळा सिंहांच्या छातीत खोल जखमा झाल्याची नोंद आहे. गंभीर दुखापत होऊन सिंहाचा मृत्यू देखील होऊ शकतो.

शहामृगाच्या पायांमध्ये अतिशय मजबूत स्नायू, लांब टेंडन्स आणि कठीण हाडांची संरचना असते. यामुळे त्यांच्या पायांमध्ये उच्च ऊर्जा साठवण आणि विसर्जन क्षमता तयार होते.

माणसाला ही लाथ थेट डोक्यावर लागली तर मानवी कवटी फुटण्याची शक्यता असते. हे क्वचित घडते, पण वैज्ञानिकदृष्ट्या शक्य आहे.

माणसाला गंभीर फ्रॅक्चर, आंतररक्तस्राव, छातीत खोल जखम होऊ शकते. शहामृगाची लाथ मान, छाती किंवा डोक्याच्या विशेष ठिकाणी बसल्यास मृत्यू होऊ शकतो.

शहामृगांची उंची 8–9 फूट आणि वजन 100–150 किलो असते. त्यामुळे त्यांची किक फक्त वेगवान नसते तर नसून जोरदार झटका देणारी असते

शहामृग आपल्यावर, अंड्यांवर किंवा पिल्लांवर धोका आल्याशिवाय हल्ला करत नाही.पण धोका जाणवल्यावर मात्र तात्‍काळ हल्ला करते.

शहामृगाच्या एका पायामध्ये 2 मोठी बोटे असतात, ज्यातील एकामध्ये 4 इंचापर्यंत लांब तीक्ष्ण नख असते. हे नख मोठी जखम करू शकते.

जमिनीवरील सर्वात वेगवान पक्षी आहे. शहामृग आपल्या शक्तिशाली पायांनी 70 किमी प्रतितास वेगवान धावतो. तसेच त्‍याची क्षमता खूप वेळ पर्यंत 50–60 किमी प्रतितास वेगाने धावण्याची असते

तसेच शहामृगाचे अंडे हे जगातील सर्वात मोठे अंडे असते. एका मादी शहामृगाकडून वर्षाला 40 ते 60 अंडी मिळू शकतात. एका अंड्याचे वजन 1.2 ते 1.5 किलो असते