स्वालिया न. शिकलगार
रिंकू राजगुरूचा मल्टीस्टारर नवा चित्रपट येतोय थप्पा
या चित्रपटात वैदेही परशुरामी, सखी गोखले, सिद्धार्थ बोडके, गौरव मोरे साईंकित कामत दिसणार आहेत
डॅनी पंडित हा डिजिटल क्रिएटर देखील रिंकूसोबत झळकणार आहे
सिड विंचूरकर यांनी दिग्दर्शन केले आहे, आता चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार आहे
मेहुल शाह आणि अमित भानुशाली निर्माते असून मैत्रीवर आधारित असा हा चित्रपट असेल, असा अंदाज लावला जातोय
रिंकूने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा ब्लॅक शर्ट मधील आऊटफिटमध्ये अगदी वेगळा लूक दिसतोय
तर चित्रपटामध्ये तिची भूमिका काय असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे
तिने फोटो शेअर करत लिहिलंय-आम्ही येतोय तुम्हाला द्यायला मैत्रीचा ‘थप्पा...!’