पुढारी वृत्तसेवा
आंबा खाण्यापूर्वी किमान अर्धा ते एक तास पाण्यात भिजवून ठेवावा, ज्यामुळे त्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते
आंब्यामध्ये फायटिक ॲसिड असते, जे पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणू शकते. पाण्यात भिजवल्याने हे घटक कमी होतात
आंबा सकाळी किंवा दुपारच्या जेवणासोबत खाणे उत्तम. रात्री उशिरा आंबा खाणे टाळावे कारण ते पचण्यास जड जाऊ शकते
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, जेवणानंतर किमान १ तासाने आंबा खावा
रसायनांनी (कार्बाइड) पिकवलेले आंबे खाल्ल्याने पोटाचे गंभीर विकार होऊ शकतात, त्यामुळे खात्रीशीर ठिकाणाहूनच आंबे खरेदी करा
आंबा आणि दूध (आम्ररस) यांचे मिश्रण सात्विक मानले जाते. परंतु, आंबट आंबा दुधात मिसळणे टाळावे, यामुळे त्वचाविकार किंवा पचनाच्या समस्या होऊ शकतात.
आंबा चविष्ट असला तरी एका दिवसात दोनपेक्षा जास्त आंबे खाणे टाळावे. अतिसेवनाने जुलाब किंवा उष्णतेचे फोड येऊ शकतात
आंब्याचा देठाकडील चीक नीट काढावा. हा चीक त्वचेला किंवा ओठांना लागल्यास खाज सुटणे, रॅशेस येणे किंवा फोड येणे अशा समस्या उद्भवू शकतात
आंबा खाताना त्यासोबत थोडे तूप किंवा सुंठ पावडर घेतल्यास आंब्याचे पचन अधिक सुलभ होते आणि वात-पित्ताचा त्रास कमी होतो.
आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि मर्यादित प्रमाणात आंबा खावा