Mango Facts | दिवसाला किती आंबे खावेत? जास्त खाल्ल्यास काय परिणाम होतात?

पुढारी वृत्तसेवा

आंबा हा फळांचा राजा असला तरी त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते

एका दिवसात किती आंबे खावेत आणि त्याचे काय परिणाम होतात, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे

सामान्यतः, एका सुदृढ व्यक्तीने दिवसाला १ ते २ मध्यम आकाराचे आंबे खाणे सुरक्षित मानले जाते.

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल किंवा रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल, तर अर्धा किंवा एक आंबा पुरेसा आहे

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज) भरपूर असते. एका दिवसात जास्त आंबे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते

आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. मर्यादेपेक्षा जास्त आंबे खाल्ल्याने जुलाब (Diarrhea), पोटदुखी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो

आंबा हा कॅलरीयुक्त फळ आहे. सातत्याने जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज वाढून वजन वाढण्याची शक्यता असते

आयुर्वेद आणि आहारशास्त्रानुसार, आंब्याचे स्वरूप उष्ण असते. अतिसेवनामुळे शरीरातील उष्णता वाढून उष्णतेचे फोड (Pimples) किंवा पुरळ येऊ शकतात

काही लोकांना आंब्याच्या चिकाची किंवा फळाची ऍलर्जी असू शकते, ज्यामुळे घसा खवखवणे किंवा सूज येणे असे त्रास होऊ शकतात

येथे क्लिक करा