Rahul Shelke
हा प्रश्न आजकाल प्रत्येक पालकाला पडतो! लवकर शाळेत टाकलं की मुलं ‘जास्त हुशार’ होतात का? चला जाणून घेऊया!
बालरोगतज्ज्ञ डॉ. निमिषा अरोडा यांचा सल्ला आहे की, बहुतेक मुलांसाठी 3 वर्षं ही प्ले स्कूल सुरू करण्याची योग्य वेळ आहे.
3 वर्षांपर्यंत मुलं—थोडी समजूतदार होतात, आई-वडिलांपासून काही वेळ वेगळी राहू शकतात, नवीन वातावरण स्वीकारायला शिकतात
काही मुलांना 2.5 वर्ष तर काही मुलांना 3.5 ते 4 वर्षांपर्यंत घरचं वातावरणच जास्त योग्य वाटतं. म्हणून एक नियम सगळ्यांसाठी लागू होत नाही.
डॉक्टर स्पष्ट सांगतात लवकर शाळेत पाठवल्याने मुलं ‘जास्त स्मार्ट’ होतात, असं नाही.
शाळेपेक्षा मुलांसाठी महत्त्वाचं आहे, खेळणं, प्रश्न विचारणं, गोष्टी ऐकणं, आई-वडिलांसोबत वेळ घालवणं.
प्ले स्कूलचा निर्णय वयावर नाही… तयारीवर घ्या! मुलं किती समजूतदार आहेत, हे महत्त्वाचं.
जर मुलं भावनिकदृष्ट्या तयार नसतील तर— रडणं वाढू शकतं, भीती वाटू शकते, असुरक्षितता जाणवू शकते.
डॉक्टर सांगतात— मुलं जेव्हा सुरक्षित आणि आनंदी असतात, तेव्हाच ती नीट शिकतात. खेळातून मुलांची शिकण्याची प्रक्रिया सर्वात चांगली होते.
समाज/नातेवाईकांच्या दबावामुळे निर्णय घेऊ नका. मुलं तयार असतील तेव्हाच प्ले स्कूलमध्ये घाला. योग्य निर्णय घेण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या