अविनाश सुतार
ग्लास स्किन, तेजस्वी, निर्दोष आणि चमकदार त्वचेसाठी महिलांकडून अनेक सौंदर्या प्रसाधने वापरली जातात
कोरियन स्किनकेअरमध्ये तांदळाचे पाणी हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो, कारण त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात
तांदळाच्या पाण्यामुळे सुरकुत्या, बारीक रेषा आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत होते. ही पारंपरिक पद्धत आता जगभर लोकप्रिय होत आहे
तांदळाचे पाणी त्वचा स्वच्छ करण्यास, डाग कमी करण्यास मदत करते आणि त्वचा मऊ व चमकदार बनवते
मुरुम, पिग्मेंटेशन किंवा संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी तांदळाच्या पाण्याचा अतिरेक टाळावा
कोरफडमधील जंतुनाशक आणि आर्द्रता देणारे गुण सुरकुत्या कमी करतात कोलेजन निर्मिती वाढवतात आणि त्वचा मऊ व निर्दोष बनवतात
काकडीच्या चकत्या किंवा रस चेहऱ्यावर लावल्याने सूज आणि दाह कमी होतो तसेच त्वचा स्वच्छ दिसू लागते. काकडीचे फेस पॅकही एक उत्तम पर्याय आहे
ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील दाह आणि लालसरपणा कमी करतात, त्वचेला ताजेतवाने आणि पुनरुज्जीवित करतात
ग्रीन टीच्या पिशव्या चेहऱ्यावर ठेवणे ही चमकदार त्वचेसाठी एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे