अविनाश सुतार
एकाच पद्धतीने तयार केल्यास गरम कॉफीत थंड कॉफीपेक्षा थोडेसे अधिक कॅफिन असते. जास्त कॅफिनमुळे जागरूकता आणि एकाग्रता वाढते
कोल्ड ब्रू कॉफी अधिक मृदू चवीची आणि कमी आम्लयुक्त असते. यात कॅफिन हळूहळू शरीरात शोषले जाते, त्यामुळे गरम कॉफी घेतल्यावर अस्वस्थ वाटणाऱ्या लोकांसाठी योग्य ठरू शकते
गरम कॉफी पोटातील आम्ल स्राव वाढवते. काहींसाठी हे पचनास मदत करते, तर काहींमध्ये आम्लपित्त, छातीत जळजळ किंवा पोट फुगणे यासारख्या तक्रारी होतात
थंड कॉफी, विशेषतः कोल्ड ब्रू, पोटासाठी अधिक सौम्य असते. आम्लपित्त किंवा संवेदनशील पचनसंस्थेच्या लोकांना थंड कॉफी अधिक सहन होते
काळी गरम कॉफी जवळजवळ शून्य कॅलरीची असते. मात्र थंड कॉफीमध्ये बहुतेक वेळा दूध, साय, साखर, सिरप किंवा आइस्क्रीम घातले जाते
थंड कॉफीत साखरेचे प्रमाण जास्त असेल, तर ती आरोग्यदायी पेय न राहता मिठाईसारखी ठरते. कमी दूध व कमी साखर असलेली साधी कोल्ड ब्रू कॉफी हा चांगला पर्याय ठरतो
गरम आणि थंड दोन्ही प्रकारच्या कॉफीत हृदयाच्या आरोग्यास व चयापचयास मदत करणारे अँटिऑक्सिडंट्स असतात. गरम कॉफीत हे घटक थोड्या प्रमाणात अधिक मुक्त होतात
कमी कॅलरी, लवकर जागरूकता हवी असल्यास आणि साधी कॉफी आवडत असेल तर गरम कॉफी निवडा
आम्लपित्ताची समस्या असल्यास, मृदू चव आवडत असेल आणि साखर कमी ठेवता येत असेल तर थंड कॉफी निवडा