Republic Day 2026 | प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या 'या' खास गोष्टी माहीत आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

भारतीय प्रजासत्ताक दिन केवळ एक उत्सव नाही, तर तो आपल्या लोकशाहीचा कणा आहे. या दिनाशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित आपल्याला माहित नसतील. जाणून घेऊया या गौरवशाली दिवसाचा प्रवास.

26 जानेवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटीश राजवटीविरुद्ध 'पूर्ण स्वराज'ची घोषणा केली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून २६ जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून निवडण्यात आला.

प्रदीर्घ विचारमंथनातून साकारलेले भारताचे संविधान तयार करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद नव्हती. जगातील सर्वात मोठी लोकशाही घडवण्यासाठी संविधान सभेला २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस इतका प्रदीर्घ काळ लागला.

कलेचा आणि अक्षरांचा संगम आपले मूळ संविधान टाईप केलेले किंवा मुद्रित नसून ते पूर्णपणे हस्तलिखित आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी अत्यंत सुंदर सुलेखनात ते इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहून काढली होती.

संविधानाच्या या मूळ हस्तलिखित प्रती संसदेच्या ग्रंथालयात विशेष हेलियमने भरलेल्या पारदर्शक पेट्यांमध्ये ठेवल्या आहेत.

आज आपण राजपथावर (कर्तव्यपथ) भव्य परेड पाहतो; पण १९५० मधील प्रजासत्ताकाची पहिली परेड दिल्लीतील 'इरविन स्टेडियम'वर (सध्याचे मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम) पार पडला होता.

प्रजासत्ताक दिनाला परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परंपरा पहिल्यापासूनच आहे. १९५० मध्ये भारताचे पहिले मुख्य पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सुकर्णो उपस्थित होते.

१९५२ मध्ये एका दुःखद घटनेमुळे प्रजासत्ताक दिनाचे औपचारिक सोहळे रद्द करण्यात आले होते. ब्रिटनचे राजा जॉर्ज सहावा यांच्या निधनामुळे भारत सरकारने हा निर्णय घेतला होता.

प्रजासत्ताक दिनाचा उत्सव केवळ २६ जानेवारीपुरता मर्यादित नसतो. २९ जानेवारी रोजी होणाऱ्या 'बीटिंग रिट्रीट' या समारंभाने या चार दिवसांच्या भव्य सोहळ्याची अधिकृत सांगता होते.

येथे क्‍लिक करा.