पुढारी वृत्तसेवा
पाण्याशिवाय जीवन जगणे अशक्य आहे. भारतातून ४०० पेक्षा जास्त नद्या वाहतात. यामध्ये 'गंगा' ही सर्वात लांब, तर 'ब्रह्मपुत्रा' ही सर्वात मोठी नदी आहे.
थार वाळवंटातून वाहणारी मुख्य नदी कोणती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
थार वाळवंटातील 'लुणी' ही एकमेव महत्त्वाची नदी आहे. विशेष म्हणजे ही नदी समुद्राला मिळत नाही, तर ती राजस्थानमध्ये सुरू होऊन गुजरातच्या 'कच्छच्या रणात' (दलदलीच्या भागात) लुप्त होते.
लुणी नदीला वाळवंटाची जीवनरेखा मानले जाते. ही नदी अजमेरजवळील अरवली पर्वतातून उगम पावते आणि सुमारे ४९५ किलोमीटरचा प्रवास करते.
ही नदी राजस्थानमधील जोधपूर आणि बारमेर या जिल्ह्यांमधून वाहत पुढे गुजरातमध्ये प्रवेश करते.
या नदीला 'लवणावरी' (खारट नदी) म्हणतात. स्थानिक लोक तिला 'अर्धी गोड आणि अर्धी खारट' नदी असेही म्हणतात.
या नदीचे पाणी सुरुवातीच्या १०० किलोमीटरपर्यंत गोड असते. मात्र, 'बालोत्रा' या ठिकाणी पोहोचल्यानंतर ते खारट होऊ लागते.
लुणी ही बारमाही वाहणारी नदी नाही. ती फक्त पावसाळ्यात वाहते आणि उन्हाळ्यात कोरडी पडते.