Anirudha Sankpal
अनेक लोकांच्या घरांमध्ये दूध वारंवार गरम करण्याची सवय असते; सकाळी त्यानंतर दुपारपर्यंत संपले नाही तर दूध पुन्हा एकदा तापवायचे.
वारंवार दूध गरम केल्यामुळे 'अॅडव्हान्स ग्लायकेशन प्रॉडक्ट' (Advanced Glycation Products) वाढतात.
हे 'अॅडव्हान्स ग्लायकेशन प्रॉडक्ट' ओबिसोजन (Obesogen) म्हणून ओळखले जातात, म्हणजेच त्यांचा संबंध लठ्ठपणाशी आहे.
यामध्ये मुख्यत्वे दोन मॉलिक्यूल्स (रेणू) असतात. एक म्हणजे CML (कार्बॉक्सी मिथिल लायसिन) आणि दुसरे CEL (कार्बॉक्सी इथिल लायसिन).
हे केमिकल्स तुमच्या रक्तवाहिन्यांना कडक करतात. तसेच, हे केमिकल्स लाल रक्तपेशींची (RBCs) लवचिकता (fluidity) कमी करतात, ज्यामुळे त्या कडक होतात.
आरबीसीची लवचिकता कमी झाल्यामुळे त्या छोट्या रक्तवाहिन्यांमधून व्यवस्थित पास होऊ शकत नाहीत.
यामुळे अटॅक येऊ शकतो किंवा यकृताची (liver) सूज वाढायला लागते आणि यकृतामधील चरबी वाढायला लागते.
या विषयावर प्रचंड संशोधन पत्रे (research papers) उपलब्ध आहेत.
परंतु, अन्न उद्योगामुळे (Food Industry) असे संशोधन सहसा लोकांपर्यंत पोहोचू दिले जात नाही.