Reflex Tears | मोटरसायकलवरुन प्रवास करताना डोळ्यांमध्ये पाणी का येते?

Namdev Gharal

आपण नेहमी पाहतो की हेल्मेट किंवा गॉगल घातला नसेल तर डोळ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी येते

हे पाणी डोळ्यात वारे शिरल्याने होत नाही तर यापाठीमागे असतो आपल्या मेंदूचा संदेश

प्रवास करताना वारे हवा थेट आपल्या डोळ्यात शिरतो यावेळी डोळ्यातील ओलावा सुकून जातो व डोळे कोरडे पडू लागतात

यावेळी डोळयांमधील अश्रू ग्रंथीना अधिक पाणी तयार करण्याचा संदेश मेंदू देतो. कारण डोळे कोरडे पडू नयते या अश्रूंना म्हणतात ‘रिफ्लेक्स टीयर्स’

वेगाने येणाऱ्या वाऱ्यासोबत हवेतील धुलीकण, धूर डोळ्यांत जाण्याची शक्यता असते. या बाहेरील कणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी या अश्रूंचा उपयोग होतो

प्रवास करताना हवा कोरडी असेल किंवा थंडीचे दिवस असतील, तर डोळ्यांतील नैसर्गिक ओलावा टिकवणे कठीण जाते. यामुळे डोळ्यांना खाज सुटते किंवा जळजळ होते आणि परिणामी पाणी येते.

जास्त वेळ डोळा कोरडा राहिल्यास डोळयातील रेटिना व इतर महत्‍वाच्या अंगाना इजा होऊ शकते त्‍यामुळे हे अश्रू महत्‍वाचे असतात

यावर उपाय म्हणजे हेल्मेटचा वापर, नेहमी पूर्ण चेहरा झाकणारे हेल्मेट वापरा आणि त्याची काच खाली ठेवा.

जर हेल्मेटला काच नसेल, तर चांगल्या दर्जाचे गॉगल्स वापरा जेणेकरून वारा थेट डोळ्यांत जाणार नाही.

Expensive Injection | या इंजेक्शनच्या किंमती ऐकून बसेल धक्का!