Expensive Injection | या इंजेक्शनच्या किंमती ऐकून बसेल धक्का!

Namdev Gharal

अनेक आजार दुर्मिळ असतात त्‍यावरील उपचारदेखिल तेवढेच महाग असतात. काही इंजेक्शन इतकी महाग असतात की सामान्य किंवा श्रीमंतांच्याही आवाक्या बाहेरील असतात.

यामध्ये पाचव्या क्रमांकावर येथे लक्सटुर्ना (Luxturna) नावाचे इंजेक्शन याची सुमारे ७ कोटी रुपयांपर्यंत जाते रेटिनल डिस्ट्रॉफी (Retinal Dystrophy) नावाच्या आजारासाठी हे वापरले जाते

हा डोळ्यांचा रेटिनल डिस्ट्रॉफी एक दुर्मिळ आजार आहे ज्यामुळे व्यक्ती पूर्णपणे अंध होऊ शकते. हे औषध दृष्टी परत मिळवण्यासाठी मदत करते.

चौथ्या क्रमांकावर महागडे इंजेक्शन येते ते म्हणजे झोलगेन्स्मा (Zolgensma) याची किंमत सुमारे १८ कोटी रुपये ($2.1 Million) असते हे स्पाइनल मस्क्यूलर ॲट्रोफी (SMA) वापरले जाते

Zolgensma हे इंजेक्शन भारतात सर्वाधिक चर्चेत असते. लहान मुलांच्या स्नायूंमध्ये कमजोरी निर्माण करणाऱ्या या आजारावर हा एकमेव प्रभावी उपाय आहे.

तिसऱ्या क्रमांकावर येते ते म्हणजे झिन्टेग्लो (Zynteglo) नावाचे इंजक्शन याची किंमत सुमारे किंमत सुमारे २३ कोटी रुपये ($2.8 Million) आहे हे बीटा थॅलेसेमिया साठी वापरले जाते

बीटा थॅलेसेमिया या आजारात रुग्णाच्या शरीरात हिमोग्लोबिन तयार होत नाही. Zyntegloहे इंजेक्शन घेतल्यावर रुग्णाला वारंवार रक्त चढवण्याची गरज भासत नाही.

दुसऱ्या क्रमांकावर महाग इंजेक्शन म्हणजे स्कायसोना (Skysona) याची किंमत सुमारे २५ कोटी रुपये आहे याचा उपयोग सेरेब्रल ॲड्रिनोल्युकोडिस्ट्रोफी (CALD). याचा आजारासाठी केले जाते

CALD हा मेंदूचा एक अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेणा आजार आहे, जो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळतो. ही जीन थेरपी या आजारावर गुणकारी ठरते.

जगातील सर्वात महाग इंजेक्शन आहे हेमिजेनिक्स (Hemgenix) याची किंमत सर्वाधिक म्हणजे सुमारे ३० कोटी रुपये आहे. हिमोफिलिया बी (Hemophilia B) या आजारावर याचा उपयोग होतो

हिमोफिलिया बी हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबते. हे जगातील सर्वात महागडे औषध मानले जाते.