Namdev Gharal
आपल्याकडे कोणालाही हिनवण्यासाठी वानंरांची उपमा दिली जाते. पण जगात असेही एक वानर आहे की जे खरोखर सुंदर व सोज्वळ दिसते.
red shanked douc langur हे निसर्गाची अद्भूत कलाकृती आहे हे वानर फक्त आग्नेय आशियातील व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया मधील घनदाट जंगलात आढळतात.
रेड-शँक्ड डोक लँगर हे जगातील सर्वात रंगीबेरंगी वानर मानले जातात. यांच्या शरीरावर निसर्गाने उधळलेले विविध रंग पाहून आश्चर्यचकीत व्हायला होते वाटेल.
यांचे पाय गडद लाल (Maroon) रंगाचे असतात, म्हणून यांना 'रेड-शँक्ड' म्हणतात. यांचा चेहरा पिवळसर-नारंगी असून डोळ्यांभोवती निळसर झाक असते. टोपी घातलेल्या माणसारखा असतो.
या वानराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पांढरी लांब दाढी. राखाडी शरीर, लाल पाय आणि पांढरी दाढी यामुळे हे वानर अत्यंत रुबाबदार दिसते
ही वानरे क्वतितच जमिनीवर येतात बहुतांश वेळ झाडांच्या शेंड्यावर राहणे अधिक पसंत करतात.
या वानरांचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ती पूर्णपणे शाकाहारी असतात. कोवळी पाने, फळे, फुले आणि फांद्या हे त्यांचे मुख्य अन्न आहे. त्यांना अन्नातूनच पाणी मिळते.
हे अत्यंत सामाजिक प्राणी असून समूहाने (Groups) राहतात. एका समूहात साधारण ४ ते १५ वानर एकत्र राहतात.
अतिसंकटग्रस्त प्रजाती म्हणून नोंद, शिकार आणि जंगलांचा नाश यामुळे ही प्रजाती आता 'अतिसंकटग्रस्त' (Critically Endangered) श्रेणीत आली आहे.