chocolate cravings: चॉकलेट सारखं सारखं का खावंस वाटतं, काय आहे शास्त्रीय कारण?

Anirudha Sankpal

चॉकलेट हे चवीला मधुर असते आणि ते शरीरासाठी मॅग्नेशियमचा एक उत्तम स्रोत मानले जाते.

हे खाल्ल्यामुळे शरीरात एंडोर्फिन आणि सेरोटोनिन सारख्या हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे तुमचा मूड लगेच सुधारतो (Mood Booster).

थकवा जाणवत असल्यास चॉकलेट खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा (Quick Energy) मिळते आणि मानसिक आराम मिळतो.

मात्र, याचे अतिसेवन केल्यास वजन वाढणे, पिंपल्स येणे आणि रक्तातील साखर (Blood Sugar) अचानक वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात.

शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) असल्यास किंवा खूप ताण (Stress) जाणवत असल्यास चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा होते.

जेव्हा तुम्ही खूप थकलेले असता, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी गोड पदार्थांची मागणी करते, म्हणूनच आपल्याला वारंवार चॉकलेट खावसे वाटते.

चॉकलेटची ही ओढ कमी करण्यासाठी किंवा आरोग्यासाठी नेहमी डार्क चॉकलेट निवडणे हा एक चांगला पर्याय आहे.

थोडक्यात सांगायचे तर, मर्यादित प्रमाणात चॉकलेट खाणे फायदेशीर ठरते, पण अतिरेक टाळणे आरोग्यासाठी गरजेचे आहे.

येथे क्लिक करा