Summer Hacks: पंखा लावूनही 'भट्टी' झालेली रूम थंड होत नाही... वापरा या भन्नाट टीप्स

Anirudha Sankpal

गरम हवेचा सापळा

पंखा फक्त खोलीतील गरम हवा फिरवतो; जोपर्यंत ही हवा बाहेर जात नाही, तोपर्यंत खोली थंड होत नाही.

क्रॉस व्हेंटिलेशन

खोलीच्या समोरासमोरच्या खिडक्या किंवा दरवाजे उघडे ठेवल्याने बाहेरची ताजी हवा आत येते आणि गरम हवा बाहेर ढकलली जाते.

दोन पंख्यांचा वापर

एक पंखा खिडकीजवळ गरम हवा बाहेर फेकण्यासाठी (Exhaust) ठेवावा आणि दुसरा पंखा ताजी हवा आत घेण्यासाठी वापरावा.

एकच पंखा असल्यास

जर एकच टेबल फॅन असेल, तर तो खिडकीकडे तोंड करून लावावा, जेणेकरून तो खोलीतील उष्णता वेगाने बाहेर फेकेल.

योग्य वेळ

ही युक्ती सकाळी किंवा संध्याकाळी करावी, कारण त्यावेळी बाहेरचे तापमान खोलीच्या तुलनेत कमी असते.

दुपारची काळजी

दुपारी बाहेरची हवा खूप गरम असते, त्यामुळे अशा वेळी खिडक्या उघड्या ठेवल्यास फायदा होण्याऐवजी उष्णता वाढू शकते.

सीलिंग फॅनची दिशा

उन्हाळ्यात छताचा पंखा 'अँटी-क्लॉकवाईज' (घड्याळाच्या उलट दिशेने) फिरला पाहिजे, ज्यामुळे हवा थेट खाली येते आणि जास्त थंडावा मिळतो.

नैसर्गिक एसी

योग्य हवा खेळती राहिल्यामुळे (Air Circulation) विजेची बचत होते आणि एसीशिवाय खोली नैसर्गिकरित्या थंड राहते.

थंडावा मिळवण्याचे शास्त्र

हवा येण्याचा आणि जाण्याचा मार्ग मोकळा करणे हाच उष्णतेपासून सुटका मिळवण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग आहे.

येथे क्लिक करा