Reading vs. Listening : वाचन की ऐकणं... लक्षात ठेवण्याची प्रभावी पद्धत कोणती?
पुढारी वृत्तसेवा
मागील काही वर्षांमध्ये स्मार्टफोनमुळे वाचनापेक्षा ऑडिओ ऐकण्याचे प्रमाण वाढले आहे.
आकलन आणि शिकण्याच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने वाचन आणि श्रवण दोन्ही महत्त्वाचे ठरतात.
वाचन अधिक प्रभावी ठरते की ऐकणं, या विषयावर अनेक अभ्यास झाले आहेत. सर्व अभ्यास दोन्ही पद्धतींची परिणामकारकता तपासतात.
आनंदासाठी वाचणे किंवा ऐकणे आणि शिकण्यासाठी वाचणे किंवा ऐकणे यामध्ये फरक आहे, हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठाचे मानसशास्त्र प्राध्यापक मॅथ्यू ट्रॅक्सलर यांच्या संशोधनानुसार आपण ऐकतो की वाचतो, याकडे दुर्लक्ष केलं तरी मानसिक यंत्रणा तीच राहते.
अभ्यासात प्रौढ व्यक्तींना दोन गटांत विभागले. एका गटाला वाचायला दिले तर दुसऱ्या गटाला ऑडिओ ऐकायला दिला. यावेळी चाचणी गुणांमध्ये फारसा फरक दिसला नाही.
बर्कले येथील न्यूरोसायंटिस्ट्सनी एमआरआय (MRI) मेंदू स्कॅनचा अभ्यास केला. वाचन आणि श्रवण या दोन्हीमुळे मेंदू समान प्रमाणात उत्तेजित होतो. परिणामांमध्ये दोन्ही क्रियांमध्ये लक्षणीय फरक आढळला नाही.
ऑडिओ ऐकताना एखादी व्यक्ती विचलित झाली, तर विषयाची संकल्पना समजण्याची शक्यता कमी असते, असेही आढळले.
व्यक्ती वाचताना विचलित झाली, तरी विषय समजून घेण्यासाठी आवश्यक तेवढ्या वेळा शब्द पुन्हा वाचता येतात. या दृष्टीने स्मृती आणि आकलनासाठी वाचन अधिक चांगले असल्याचेही अभ्यासात स्पष्ट झाले.
एक अभ्यास असे सांगतो की, परदेशी भाषा शिकण्यासाठी वाचन प्रभावी ठरते. वाचनामुळे शब्द आणि त्यांचा वापर लक्षात ठेवण्याची आपली क्षमता दृढ होते.
येथे क्लिक करा.