पुढारी डिजिटल टीम
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा आता IPL 2026 सीझनमध्ये आपल्या पहिल्या फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्समध्ये परतण्याची शक्यता आहे.
2012 मध्ये जडेजा CSKमध्ये सामील झाला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यानं तीन वेळा टीमला IPL चॅम्पियन बनवलं – 2018, 2021 आणि 2023 मध्ये.
2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जनं IPL मेगा ऑक्शनमध्ये रवींद्र जडेजाला तब्बल ₹ 9.2 कोटींना विकत घेतलं होतं. त्यावेळी तो टीममधील सर्वाधिक महागडा खेळाडू होता.
2014 मध्ये त्याचा पगार कमी होऊन ₹5.5 कोटी झाला. मात्र 2018 मध्ये पुन्हा CSKमध्ये परतताना त्याचा करार ₹7 कोटींवर पोहोचला.
2022 मध्ये CSKनं जडेजाला ₹16 कोटींना रिटेन केलं. 2025 मध्ये त्याचं रिटेन्शन वाढून तब्बल ₹18 कोटींवर गेलं.
रवींद्र जडेजानं चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना एकूण ₹123.4 कोटींची कमाई केली आहे.
हा आकडा पाहून चाहत्यांनाही धक्का बसेल.
धोनीनं CSKकडून एकूण ₹192.8 कोटींहून अधिक कमावले आहेत, तर जडेजा ₹123.4 कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
12 वर्षं, 3 IPL कप, शेकडो विकेट्स आणि असंख्य चौकार.