पुढारी वृत्तसेवा
तुमच्या घरात लाल मुंग्यांचा त्रास वाढला आहे का? यापासून सुटका मिळवण्यासाठी हे सात सोपे उपाय नक्की करुन पाहा.
खिडक्या, दारे आणि पाईप्सच्या आसपासच्या भेगा आणि फटी 'कॉक' वापरून मुंग्यांचे मार्ग सीलबंद करा
स्वयंपाकघरातील फरशी झाडून नियमित पुसा. मुंग्या अन्नाच्या वासाने आकर्षित होतात.सर्व अन्नपदार्थ हवाबंद डब्यांमध्ये साठवा.
दालचिनी , तिखट मिरची पावडर किंवा लिंबूवर्गीय फळांची साले मुंग्यांच्या वाटेवर पसरवा. याचा वास लाल मुंग्यांना दूर ठेवतो.
बोरिक ॲसिड, साखर आणि पाणी एकत्र करून एक मिश्रण तयार करुन मुंग्यांच्या असणार्या ठिकाणी ठेवा. यामुळे मुंग्याचे मूळ जागाच नष्ट होण्यास मदत होईल.
बाजारात उपलब्ध असणारे फेप्रोनील किंवा हायड्रामिथिलनॉन असलेले चिकट सापळे वापरा.
पांढरा व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे मिश्रण मुंग्यांच्या मार्गावर आणि त्यांच्या बिळांवर फवारा.
हे उपाय करूनही मुंग्यांचा त्रास कमी होत नसेल, तर पेस्ट कंट्रोल करणार्या 'व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घ्या.