Raveena Tandon Fitness: या ३ गोष्टीत लपलंय ५४ वर्षाच्या रवीना टंडनच्या फिटनेसचं रहस्य

Anirudha Sankpal

रवीना टंडन कठीण डाएट किंवा जिममध्ये तासनतास वेळ न घालवता घरच्या साध्या अन्नाला प्राधान्य देतात.

१ - रवीन टंडन रोजच्या जेवणात प्रामुख्याने डाळ, भाजी आणि प्रोबायोटिक्सयुक्त दही आवर्जून खातात, जे पोटासाठी उत्तम असते.

त्या बाजारातील तूप न खाता केवळ घरचे बनवलेले शुद्ध तूप खाणे पसंत करतात.

Ghee | Pinterest

रवीना टंडन यांच्या फार्म हाऊसवरील सेंद्रिय (ऑर्गेनिक) हळद, अजवाइन, लवंग, काळी मिरी, आलं आणि तुपापासून बनवलेला खास काढा आरोग्यासाठी घेतला जातो.

२- त्या स्वतःसह आपल्या मुलांना सर्व प्रकारच्या एरियेटेड सोडा आणि कोल्ड्रिंक्सपासून दूर ठेवतात.

व्यायामामध्ये त्यांना जिमऐवजी स्विमिंग करणे आवडते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते आणि स्नायू मजबूत होतात.

३- स्विमिंगसोबतच त्या योगासने, चालणे (walking) आणि धावणे (running) यांसारख्या व्यायामांचा नियमित सराव करतात.

त्वचेवरील सुरकुत्या रोखण्यासाठी आणि त्वचा तरतरीत ठेवण्यासाठी त्या नियमितपणे चेहऱ्याला आणि अंगाला तेलाने मसाज करतात.

Neck Face Massage | pudhari photo
येथे क्लिक करा