Bones Health: जास्तवेळ घरात बसण्याचे हाडांवर होणारे ८ दुष्परिणाम

Anirudha Sankpal

दिवसभर घरात राहिल्याने सूर्यप्रकाश, हालचाल आणि पोषण या तिन्ही गोष्टींचा अभाव निर्माण होऊन हाडांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

canva photo

हाडांची समस्या फक्त वृद्धांचा प्रश्न नसून २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्येही ही समस्या वेगाने वाढत आहे.

सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे शरीराला अन्नातून कॅल्शियम शोषून घेणे कठीण जाते.

काचेच्या खिडकीतून येणारे उन्हाचे किरण व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त असणारे UVB किरण अडवतात.

सतत बसून राहिल्याने हाडांना भार पेलण्याची प्रेरणा मिळत नाही, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

दीर्घकाळ बसण्याच्या सवयीमुळे पाठीचा कणा आणि नितंबांभोवतीचे स्नायू कमकुवत होऊन मान व पाठदुखीचा त्रास सुरू होतो.

आहारातील कॅल्शियम-प्रथिनांची कमतरता, धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयींमुळे हाडांचे आरोग्य अधिक खालावते.

हाडे मजबूत ठेवण्यासाठी रोज थोडा वेळ उन्हात राहणे, चालणे, व्यायाम करणे आणि कॅल्शियमयुक्त आहाराचा समावेश करणे गरजेचे आहे.

येथे क्लिक करा