रश्मिका - विजयनं गुपचूप उरकला साखरपुडा...?

Anirudha Sankpal

पुष्पामधील श्रीवल्ली फेम रश्मिका अन् अभिनेता विजय देवरकोंडा यांचं अफेअर सुरु असल्याची अनेकवेळा चर्चा होते.

दक्षिणेतील हे दोन स्टार कलाकार अनेकवेळा एकमेकांसोबत फिरताना अन् वावरताना दिसले आहेत.

अनेकवेळी रश्मिका आणि देवरकोंडाने गुपचूप लग्न केल्याची अफवा देखील पसरली होती.

दरम्यान आता रश्मिकाच्या अजून एका फोटोमुळं या दोघांनी गुपचूप साखरपुडा तर उरकला नाही ना अशी शंका अपस्थित झाली आहे.

रश्मिका दुबईतील एक कार्यक्रमासाठी आली होती. त्यावेळी विमानतळावर चाहत्यांचे तिच्या बोटाकडे लक्ष गेलं.

रश्मिकाच्या बोटात हिऱ्याची रिंग दिसली अन् तिनं गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चेला ऊत आला.

मात्र त्याच संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमावेळी मात्र रश्मिकाच्या बोटामध्ये रिंग नव्हती. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

गेल्या महिन्यातच विजय आणि रश्मिका हे न्यूयॉर्कमध्ये इंडिया डे परेडमध्ये एकत्र दिसले होते.

येथे क्लिक करा