फिटनेससाठी सर्वोत्तम चालण्याची पद्धत कोणती? अनवाणी की बूट घालून?

पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही वर्षांत अनवाणी चालणे की बूट घालून चालणे, हा प्रश्न आरोग्यतज्ज्ञांसह फिटनेसची काळजी घेणार्‍यांमध्‍ये चर्चेचा विषय ठरला आहे.

Canva

पारंपरिक बूटांच्या तुलनेत अनवाणी चालणे खरोखरच अधिक फायदेशीर आहे का? यासाठी दोन्ही पद्धतींचे फायदे आणि तोटे जाणून घेणे गरजेचे आहे.

Canva

अनवाणी चालल्याने पायांची स्नायू व लिगामेंट्स नैसर्गिकरीत्या कार्यरत होतात. जमिनीचा स्पर्श थेट जाणवतो, त्याची टेक्स्चर वेदना कमी करण्यात मदत करू शकते.

Canva

संशोधनानुसार, अनवाणी चालल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात, संतुलन सुधारते आणि चालण्याची पद्धत सुधारते.

Canva

पायांचे विकार, मधुमेह, न्युरोपथी किंवा गंभीर इजा असलेल्यांसाठी अनवाणी चालणे धोकादायक ठरू शकते.

Canva

पायांचे संरक्षण हे बूट घालून चालण्याचा मुख्य उद्देश आहे. मागील काही वर्षांमध्‍ये बुटांमध्ये आर्च सपोर्ट, शॉक  ॲब्जॉर्प्शन आणि मोशन कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये असणारे बूट उपलब्‍ध आहेत .

Canva

बूट घालून चालल्याने पायांवरील दाब समान पसरतो, ज्यामुळे दुखापती व फ्रॅक्चरचा धोका कमी होतो.

Canva

सार्वजनिक ठिकाणी जंतूंचा संसर्ग होऊ नये यासाठीही बूट उपयुक्त ठरतात.

Canva

फ्लॅट फीट, संधिवात किंवा प्लांटर फॅसिआइटिस सारख्या आजार असलेल्या व्यक्तींना बूट विशेषतः मदत करतात.

Canva

अनवाणी चालल्याने स्नायू बळकट होतात, संतुलन सुधारते आणि नैसर्गिक हालचालींना चालना मिळते. मात्र, यासाठी हळूहळू सराव आवश्यक असून काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Canva

सार्वजनिक ठिकाणी चालताना बूट अधिक सुरक्षित ठरतात. पायांना आवश्यक आधार देऊन ते नैसर्गिक पद्धतीने चालण्यात मदत करतात.

Canva

अनवाणी असो की बूट घालून दोन्‍ही प्रकारे चालणे तुमच्‍या आरोग्‍यासाठी फायदेशीर ठरते. म्‍हणून चालत राहणे महत्त्‍वाचे!

Canva
येथे क्‍लिक करा.