पुढारी वृत्तसेवा
अफगाणिस्तानचा कर्णधार आणि फिरकीपटू राशिद खानने सोमवारी (दि.१६) UAE विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.
टी-२० क्रिकेटच्या स्वरूपात ७०० बळींचा टप्पा ओलांडणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आधीच राशिदच्या नावावर होता.
युएई विरुद्धच्या सामन्यात राशिद खानने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २४ धावा देत १ बळी घेतला.
युएईच्या मुहम्मद अरफानला बाद करताच राशिदने ७०० टी-२० बळींचा आकडा पूर्ण केला.
राशिद खान सध्या १९१ आंतरराष्ट्रीय बळींसह अव्वल स्थानी आहे.
या यादीत दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा टिम साऊदी (१६४ बळी) तर तिसऱ्या स्थानावर ईश सोढी (१६२ बळी) आहे.
युएईविरुद्धचा सामना जिंकल्याने कर्णधार राशीद खानच्या नेतृत्त्वाखालील अफगाणिस्तानचे 'सुपर-८' फेरी गाठण्याचे आव्हान अद्याप जिवंत आहे.