Namdev Gharal
सह्याद्रीच्या कुशीत कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर व भुदरगड-राधानगरीच्या घनदाट जंगलात वसलेला 'किल्ले रांगणा' हा ट्रेकर्ससाठी एक स्वर्गासारखा आहे.
दुर्गम आणि देखणा: किल्ले रांगणा हा देखणा किल्ला सह्याद्रीच्या घनदाट जंगलात दडलेला असून ट्रेकर्सना भुरळ घालणारा आहे. कोल्हापूरपासून हा ८० ते ९० किमी अंतरावर आहे
रांगणा किल्ल्याचे बांधकाम बाराव्या शतकात शिलाहार राजा भोज (दुसरा) याने केले होते, किल्ला अभेद्य आणि विस्तीर्ण आकाराचा आहे
कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा हा अजिंक्य असा किल्ला आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे २,९०० फूट आहे
हा किल्ला राधानगरी अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये येतो. ट्रेक करताना वाटेत उंचच उंच झाडे, रंगीबेरंगी पक्षी, रानटी फुले आणि पावसाळ्यात अनेक धबधबे पाहायला मिळतात.
रांगणाचा ट्रेक हा मध्यम ते कठीण श्रेणीत येतो. गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'भटवाडी' किंवा 'चिक्केवाडी' गावातून घनदाट झाडीतून आणि चढणीच्या वाटेने गडावर जावे लागते. चालण्यासाठी अंदाजे २ ते ३ तास लागतात.
रांगणाई देवीचे मंदिर, भक्कम आणि अजूनही शाबूत असलेले भव्य दरवाजे व बुरुज, पाण्याचे मोठे तलाव आणि नैसर्गिक पाझर तलाव इतिहासाची साक्ष देतात
हा परिसर खूप दुर्गम आणि जंगली प्राण्यांचा वावर असलेला आहे. त्यामुळे संध्याकाळ होण्यापूर्वी गड उतरणे सोयीचे ठरते. गडावर जाताना स्थानिक गाईड सोबत घेणे आणि स्वतःचे जेवण-पाणी सोबत ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
जर तुम्ही पावसाळ्यात जात असाल तर निसर्ग अतिशय सुंदर दिसतो, पण जळवा (Leeches) आणि निसरड्या वाटांचा त्रास होऊ शकतो. याची काळजी घेणे महत्वाचे ठरते
किल्ल्यावर जाताना वाटेवर 5 ते 6 ओढे-नाले आहेत. तसेच किल्ल्याच्या परिसरात नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलद्वारे किंवा कोणत्याही प्रकारे संपर्क करता येत नाही.