रणबीर कपूरच्या पुण्यातील फ्लॅटचे एका महिन्याचे भाडे किती? आकडा वाचून बसेल धक्का!

पुढारी वृत्तसेवा

रणबीर कपूरच्या फ्लॅटचा कोट्यवधींचा भाडेकरार!

पुण्यातील आलिशान फ्लॅट ३ वर्षांसाठी भाड्याने; मिळणार तब्बल ₹१.७५ कोटी.

पुण्यात नेमका कुठे आहे हा फ्लॅट?

पुण्यातील कल्याणी नगर-येरवडा परिसरातील ट्रम्प टॉवर्समध्ये हा फ्लॅट आहे.

फ्लॅटचा आकार किती आहे?

दहाव्या मजल्यावरील या फ्लॅटचे क्षेत्रफळ सुमारे ६,०९४ चौरस फूट आहे.

महिन्याचे भाडे किती?

पहिल्या वर्षी रणबीरला दरमहा ₹४.६३ लाख भाडे मिळणार आहे.

दरवर्षी वाढणार भाडे!

करारानुसार दुसऱ्या वर्षी भाडे सुमारे ₹४.८६ लाख, तर तिसऱ्या वर्षी ₹५.११ लाख होईल.

३ वर्षांत मिळणार ₹१.७५ कोटी!

सप्टेंबर २०२६ ते सप्टेंबर २०२९ या कालावधीत भाड्यातून मोठी कमाई होण्याची अपेक्षा आहे.

फ्लॅटसाठी भरली ₹२७.७८ लाखांची अनामत रक्कम

कागदपत्रांनुसार, भाडेकरारासाठी सहा महिन्यांच्या भाड्याएवढी सुरक्षा अनामत रक्कम ठेवण्यात आली आहे.

रणबीरने फ्लॅट कधी खरेदी केला?

रणबीरने २०१५ मध्ये हा फ्लॅट ११ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीत खरेदी केला होता.

याआधीही फ्लॅट दिला होता भाड्याने!

२०२३ मध्ये हाच फ्लॅट एका वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपनीला दरमहा ₹४ लाख भाड्याने दिला होता.

‘रामायण’मुळेही रणबीर चर्चेत!

रणबीर आगामी ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असून, पहिला भाग नोव्हेंबर २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

जेवणानंतर पचनासाठी खा 'हे' ५ पारंपरिक भारतीय पदार्थ

येथे क्लिक करा