पुढारी वृत्तसेवा
रजनीकांत हे नाव ऐकताच आजही थिएटरमध्ये टाळ्या-शिट्ट्यांचा वर्षाव होतो.
पण तुम्हाला माहीत आहे का? हेच सुपरस्टार १०वीत नापास झाले होते.
शाळेत कधी क्लास मॉनिटर तर कधी भाषेच्या अडथळ्यामुळे ते मागच्या बाकावरचे विद्यार्थी होते.
८वी-९वीत ते शिक्षकांच्या मदतीने कसेबसे पास झाले.
सायन्स आणि मॅथ्सने तर त्यांना सर्वात जास्त घाम फोडला!
पण संघर्ष न थांबवता, त्यांनी पुन्हा प्रयत्न करून १०वी उत्तीर्ण केली.
शिक्षणाबरोबरच त्यांनी बस कंडक्टर आणि कुली म्हणूनही काम केले.
शेवटी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ऍक्टिंगचा कोर्स घेतला आणि इतिहास घडवला.
आज ते फक्त भारताचेच नाही तर जगाचेही ‘सुपरस्टार’ आहेत.